ढोबळेंची मुक्ताफळं, दुष्काळ परिस्थिती फारशी गंभीर नाही !

May 29, 2012 9:50 AM0 commentsViews: 5

29 मे

दुष्काळानं होरपळणार्‍या जनतेला हंडाभर पाणी आणण्यासाठी चार-चार किलोमिटर पायी जावे लागत आहे. पाण्यासाठी नदी नाले,छोटे मोठ्या झर्‍यांवर तासंतास बसून कसा बसा एक हंडाभर पाणी मिळतंय. पाण्यासाठी राज्यात दोन महिलांना आपला जीवही गमवावा लागला. राज्यसरकारने 11 जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई असल्याचं कबूल केलं मात्र याला पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळेंना दुष्काळग्रस्तांची थट्टा करण्याची कुठून तरी बुध्दी आली. लक्ष्मणराव ढोबळे म्हणतात, राज्यातली दुष्काळ परिस्थिती फारशी गंभीर नाही पण मीडियाने हा दुष्काळ वाढवलेला आहे. मीडियानं दाखवलेल्या गोष्टी अवास्तव आहेत, मीडियाच्या भडक बातम्यांमुळे शेतकर्‍यांचं भलं झालं अशी मुक्ताफळं ढोबळेंनी पंढरपुरमध्ये उधळली आहेत. एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं दिल्लीत जाऊन केंद्राकडे दुष्काळासाठी मदत मागितली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी स्वत: दुष्काळी भागाचा दौरा करुन परिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं असतानाही ढोबळेंनी अशी मुक्ताफळं का उधळली हा प्रश्नच आहेत.

ढोबळे साहेब उत्तर द्या !

मंगळवेढातल्या 35 गावांचा पाणी प्रश्न का सुटला नाही ?सीना-कोळेगाव धरणाचं पाणी सोलापूरलादेण्यास ढोबळेंनी विरोध का केला नाही ?शरद पवारांचा दुष्काळाबाबतचा दावाही खोटा आहे का ?

close