पेट्रोलच्या किमती कमी होण्याची शक्यता

November 25, 2008 10:58 AM0 commentsViews: 4

25 नोव्हेंबरलवकरच पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होतील आणि असं आश्वासन पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी दिलंय. विधानसभा निवडणुकांनतर पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले जातील असे संकेत त्यांनी दिलेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सरकार या किमती घटवण्याबाबत विचार करत असल्याचं सांगितलं होतं. सध्या कच्च्या तेलाचे दर पन्नास डॉलर प्रति बॅरलपर्यंत उतरलेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यानंतरच सरकार देशात पेट्रोल-डिझेलचे दर कमी करू शकेल असंही देवरा यांनी पूर्वी सांगितलं होतं.

close