कोलकात्यात विजयोत्सवला गालबोट, चाहत्यांवर लाठीचार्ज

May 29, 2012 5:55 PM0 commentsViews:

29 मेकोलकाता नाईट रायडर्सच्या विजयानिमित्त आज पश्चिम बंगालमध्ये भव्य मिरवणूक आणि सत्कार संमारभ आयोजित करण्यात आला आहे. ईडन गार्डन मैदानावर ईडन गार्डनमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खेळाडूंचा सत्कार केला. तर दुसरीकडे स्टेडियमबाहेर पोलिसांनी चाहत्यांवर लाठीचार्ज केला. कोलकाता टीम जिंकल्यामुळे कोलकातावासीयानी आजच्या मिरवणुकीला तुफान गर्दी केली आहे. सर्व नागरीकांना सत्कार संमारभात सहभागी होण्यासाठी मोफत प्रवेश देण्यात आला होता. यामुळेच चाहत्यांनी एकच गर्दी केली. मैदान खच्चाखच भरून गेले होते. मैदानाबाहेर चाहत्यांनीही एकच गर्दी केली. मात्र मैदानात जाण्यासाठी चाहत्यांनी बॅरीकेड्स तोडले यावेळी गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला.

कोलकात्यात 'रावडी रायडर्स'ची भव्य मिरवणूक

close