कैद्यांना मिळतोय हॉस्पिटलचा पाहुणचार

May 30, 2012 9:13 AM0 commentsViews: 2

30 मे

फक्त 15 हजार रुपये द्या आणि जेलच्या हवेऐवजी सीव्हील हॉस्पिटलमध्ये आराम करा. हा फंडा सुरू आहे नाशिक रोडच्या सेंट्रल जेलचा. नाशिक रोडच्या सेंट्रल जेलमधल्या व्हीआयपी कैद्यांना जेलऐवजी सिव्हील हॉस्पिटलचा पाहुणचार मिळतोय. सेंट्रल जेलचे प्रभारी अधिक्षक शामकांत पवार यांनी याचा इन्कार केला असला तरी आयबीएन – लोकमतच्या हाती याबाबतचे पुरावेच उपलब्ध आहेत. शिवसेनेचे नगरसेवक सूर्यकांत लवटे यांचा भाऊ शिरीष लवटे, राजन गँगचा विजय केदारे यांचा या पाहुणचारात समावेश आहे. या सीव्हील हॉस्पिटलमध्ये सर्वाधिक पाहुणचार घेणार्‍या नाशिक रोड जेलमधल्या या व्हीआयपी कैद्यांच्या यादीवर…

- शिरिष लवटे

18 ते 28 ऑक्टोबर – 10 दिवस12 ते 19 नोव्हेंबर – 8 दिवस18 ते 25 जानेवारी – 7 दिवस24 ते 30 एप्रिल – 6 दिवस25 मे ते 2 जून – 8 दिवस

- विजय केदारे

19 ते 26 नोव्हेंबर – 7 दिवस3 ते 12 डिसेंबर – 9 दिवस23 ते 27 डिसेंबर – 4 दिवस27 ते 2 फेब्रुवारी – 6 दिवस

- सागर बेग

8 ते 13 ऑक्टोबर – 6 दिवस8 ते 11 नोव्हेंबर – 3 दिवस19 ते 24 नोव्हेंबर – 5 दिवस13 ते 17 डिसेंबर – 6 दिवस

close