फरार डॉ. सुदाम मुंडेंची बँक खाती गोठवली

May 30, 2012 9:26 AM0 commentsViews: 1

30 मे

परळीतील डॉ सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे यांच्या विरुध्द पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. परळी पोलीस स्थानिक पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर यांनी मुंडे कुटुंबीयांचे बँकेतील खाती गोठवली आहेत. एवढंच नाही तर परळी शहरा बाहेरील इतर बँकांतील व्यवहारही तात्काळ बंद करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे मुंडे कुटुंबातील व्यक्तींना बँकांतून पैसे काढता येणार नाही. त्याचबरोबर स्थावर मालमत्तेचे खरेदी-विक्री व्यवहार होऊ नये यासाठी बीड इथल्या उपनिबंधकांना लेखी स्वरुपात सुचना दिल्या आहेत. परळी नगर परिषदेस मुंडे कुटंुबीयांची स्थवर मालमतत्तेच्या संबंधी सर्व कागदपत्रासह माहिती देण्यासंबंधी माहिती देण्यासंबंधी लेखी स्वरुपात सुचना दिल्या आहेत. तसेच औरंगाबाद महानगरपालिकेच्या आयुक्तांना डॉ मुंडे कुटुंबीयांची स्थावर मालमत्तेसंबंधी माहिती देण्यासाठी लेखी स्वरुपाच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

close