मुंबई पालिकेत 400 कोटींचा टेंडर घोटाळा ?

May 30, 2012 9:34 AM0 commentsViews: 3

30 मे

मुंबई महापालिकेत शालेय वस्तूंसाठी देण्यात येणार्‍या टेंडर्समध्ये चारशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेचे नगरसेवक संदीप देशपाडे यांनी केला आहे. गेल्या पाच वर्षात एक हजार कोटींचे टेंडर्स दिले गेले. पण यात चारशे कोटी रुपये वाढीव किंमत म्हणून दाखवले गेल्याचा आरोप मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केला आहे. तसेच एकाच कंत्राटदाराने वेगवेगळ्या नावाने कंपन्या दाखवून हे टेंडर्स मिळवल्याचा आरोपही देशपांडेंनी केला आहे. तसेच याच कंत्राटदाराला यावर्षीचं 182 कोटी रुपयांचं शालेय साहित्याचं टेंडर का देण्यात आलंय असा सवालही संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.

close