सदगुर वामनराव पै पंचत्वात विलिन

May 30, 2012 5:53 PM0 commentsViews: 7

30 मे

आध्यात्मिक गुरू वामनराव पै यांच्यावर आज संध्याकाळी बोरीवलीतल्या दौलतनगर स्मशआनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वृद्धापकाळाने वयाच्या 89 व्या वर्षी, मुंबईतल्या कोकीळाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये काल त्यांचं निधन झालं. आज दिवसभर त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी बोरिवलीतल्या प्रभु स्मरण या निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. त्यांच्या जाण्यानं जीवन विद्येचा शिल्पकार हरपला अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटतेय. गेली 54 वर्ष त्यांनी सातत्यानं लोकांचं अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद आणि दैववाद नष्ट करण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान, सुयश आणि समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून अविरत कार्य केलं.

close