म्हाडाची लॉटरी :मुंबईतील घरांचा निकाल जाहीर

May 31, 2012 9:59 AM0 commentsViews: 54

३१ मे

मुंबईत मध्यमवर्गीयाच्या घराची स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाच्या 2 हजार 517 घरांसाठीची सोडत काढण्याचं काम आज वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात सुरु आहे. आतापर्यंत 867 सदनिकांचं वितरण पूर्ण झालं आहे. मुंबई विभागातील 273 ते 288 या संकेत नंबरच्या सदनिकांचा यात समावेश आहे. मुंबई आणि मिरा रोडमधल्या 2593 घरांसाठी एकुण 1 लाख 52 हजार 45 ऑनलाईन अर्ज आले आहेत. सकाळी 10 ते 1 यावेळेत मुंबईमधल्या घरांसाठी सोडत निघाली आणि आता 2 ते 5 या वेळेत मिरारोड साठीच्या घरांसाठी सोडत काढली जाणार आहे.

म्हाडाची लॉटरी आपण पाहू शकता वेबसाईट https://lottery.mhada.gov.in वर

close