शेतकर्‍यांच्या चुकांमुळे सोलापुरकरांनी गमावले पाणी

May 30, 2012 11:25 AM0 commentsViews: 2

30 मे

सीना- कोळेगाव धरणाचं 20 दशलक्ष घनमीटर पाणी हे पिण्यासाठी देण्यात येईल पण जर त्याचा उपयोग अन्य ठिकाणी झाला तर कारवाई करण्यात येईल असा इशारा देऊन सोडण्यात आलेलं पाणी गैरवापरामुळे बंद करण्यात आलं आहे. रविवारी सोलापुरसाठी सीना कोळेगाव धरणातून पाणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानूसार सोडण्यात आलं. मात्र आज सोलापूर आणि उस्मानाबादच्या जिल्हाधिकार्‍यांनी या भागांमध्ये दौरा केल्यानंतर या पाण्याचा वापर शेतीसाठी होत असल्याचं उघड झालं आहे. प्रत्येक शेतात पाण्याच्या मोटारी लावून पाणी उपसण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे हे पाणी बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

close