पेट्रोलियम कंपन्यांना हायकोर्टाची नोटीस

May 30, 2012 11:52 AM0 commentsViews: 1

30 मे

पेट्रोल दरवाढीसंदर्भात पेट्रोलियम मंत्रालय, अर्थमंत्रालय आणि 3 तेलकंपन्यांना मुंबई हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. देशभरात समान पेट्रोल दर असावे आणि आता करण्यात आलेली पेट्रोल दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टाने सरकारला ही नोटीस बजावली. 20 तारखेपर्यंत सरकारनं यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

close