गोदापात्रातील पाणवेलींचा बंदोबस्त करा – भुजबळ

May 31, 2012 11:51 AM0 commentsViews: 2

31 मे

गोदावरीचं गटार झाल्याची बकाल अवस्था आयबीएन लोकमतच्या 'नद्यांना हवाय श्वास' या कॅम्पेनमधून आम्ही दाखवली होती. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी याची त्वरित दखल घेतली असून गोदापात्रात वाढलेल्या या पाणवेलींचा बंदोबस्त त्वरित करण्याचे आदेश नाशिक महापालिकेला दिले आहे. तसेच महापालिकेच्या ड्रेनेजमधून नदीपात्रात सोडण्यात येणारं सांडपाणी त्वरित बंद करण्याची ताकीदही देण्यात आली. पाणवेली काढण्यासाठी महापालिकेतर्फे अडीच कोटी रुपयांचा खर्च मांडण्यात येतोय.

close