ठाण्यात नातेवाईकांनी केली हॉस्पिटलची तोडफोड

May 30, 2012 3:29 PM0 commentsViews: 1

30 मे

ठाण्यातल्या वर्तक नगरमधल्या माहेर हॉस्पिटलमध्ये गर्भपिशवीचं ऑपरेशन करताना 29 वर्षाच्या जोत्सना बेलोसे या महिलेचा मृत्यू झाला. यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरलाही लक्ष करण्याचा प्रयत्न केला. हॉस्पिटलची तोडफोड केली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे. त्यांनी मृतदेह ताब्यात घ्यायलायही नकार दिला. दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणीही नातेवाईकांनी केली आहे. हॉस्पिटलमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी माधुरी साखरदांडे आणि दोन जणांना ताब्यात घेतलं आहे.

close