विकास दरात फक्त 5.3 टक्कांची वाढ

May 31, 2012 4:41 PM0 commentsViews: 1

31 मे

भारतीय अर्थव्यस्थेला मोठा झटका बसला आहे.2011-2012 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत विकासदरात अवघ्या 5.3 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या 9 वर्षांतली विकासदराची ही सर्वात मंदगती आहे. 2010-11 मध्ये विकासदर 8.4 टक्के तर गेल्या वर्षी विकासदर 6.5 टक्के होता. पण यावर्षी उत्पादन आणि कृषी या क्षेत्रातल्या सुमार कामगिरीमुळे विकासदर मंदावला. यावरुन भाजप आणि डाव्या पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

close