माधव सानप यांचे हॉस्पिटल सील होणार ?

June 4, 2012 10:26 AM0 commentsViews: 5

04 जून

बीडमधील डॉ.शिवाजी सानप यांना बेड्या ठोकल्यानंतर आता डॉ. माधव सानप यांच्यावही कारवाईचा फास आवळला जात आहे. डॉ माधव सानप यांच्या भगवान हॉस्पिटलविरोधात कारवाईला आता सुरवात झालीय. बीडचे एसडीओ गणेश निराळे यांनी सानप यांचं भगवान हॉस्पिटल सील का करू नये अशी नोटीस बजावली आहे. याला 24 तासाच्या आत उत्तर देण्यास सांगण्यात आलंय. त्यांचं उत्तर आल्यानंतर भगवान हॉस्पिटलला सील करण्याची कारवाई होणार आहे. भगवान हॉस्पिटलचा आरोग्य विभागानं परवाना रद्द केल्यानंतरही हे हॉस्पिटल सुरुच होतं. हे आरोग्य विभागाच्या धाडीनंतर उघड झालं. त्यामुळे आज आरोग्य विभागानं जिल्हा प्रशासनाकडं हॉस्पिटलच्या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली.

close