कोल ब्लॉक्स घोटाळ्याच्या चौकशीचं केवळ नाटक -केजरीवाल

June 1, 2012 11:32 AM0 commentsViews: 1

01 जून

कोल ब्लॉसमधल्या भ्रष्टाचाराची आता सीबीआय चौकशी होणार आहे. पण, या चौकशीला टीम अण्णांनी विरोध केला आहे. सीबीआय थेट पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अधिकाराखाली येतं. त्यामुळे ही चौकशी म्हणजे पंतप्रधानांना क्लीन चीट देण्यासाठीच असल्याचा आरोप टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी केला. जनतेच्या नाही तर केवळ कंपन्यांच्या फायद्यासाठी कोल ब्लॉक्स वाटण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. 2006 ते 2009 या काळातल्या कोल ब्लॉक्स वाटपाची सीबीआय चौकशी करणार आहे. या काळात कोळसा मंत्रालय मनमोहन सिंग यांच्याकडे होतं. सरकारने 155 कोल ब्लॉक्स लिलाव न करताच वाटले. त्यामुळे देशाचं 10.7 लाख कोटींचं नुकसान झाल्याचा ठपका कॅगनं ठेवला. पण आपण निर्दोष असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय. तसं असेल तर मग निष्पक्ष समितीकडून चौकशीला पंतप्रधान का घाबरतात असा सवाल केजरीवाल यांनी विचारला.

close