बाबा रामदेव यांनी घेतली नितीन गडकरींची भेट

June 4, 2012 10:35 AM0 commentsViews: 3

04 जून

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात बाबा रामदेव यांनी आता आपली रणनीती बदलली आहे. बाबा रामदेव सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटणार आहेत. आज त्यांनी भाजपचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची भेट घेतली. आणि काळ्या पैशाच्या मुद्दयावर भाजपनं पाठिंबा द्यावा अशी मागणी केली. भाजपनेही बाबा रामदेव यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून त्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यांचीही बाबा रामदेव भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांवर टीम अण्णांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

close