भाजपच्याच मुखपत्रातून नरेंद्र मोदींवर टीका

June 1, 2012 12:42 PM0 commentsViews:

01 जून

भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींनी बुधवारी आपल्या ब्लॉगमधून नितीन गडकरींवर तोफ डागल्यानंतर पक्षाचं मुखपत्र कमल संदेशमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली. या मुखपत्राच्या संपादकीय पानावर मोदींनी संयम पाळण्याचा सल्ला देण्यात आला. मोदींनी घाई केल्याने पक्षशिस्तीचा भंग होत असल्याचं यात लिहिण्यात आलंय. यामुळे पुन्हा एकदा अडवाणी आणि मोदीविरुद्ध नितीन गडकरी या संघर्षाला धार चढलीये. दरम्यान, आज नितीन गडकरींनी या मुद्यावर प्रतिक्रिया देणं टाळलंय. ते आज नागपूरमध्ये पोहोचले. तर अडवाणी हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी केलेली टीका सूचन म्हणून स्वीकारतो अशी प्रतिक्रिया राजनाथ सिंग यांनी दिली.

close