राकेश धावडेला न्यायालयात हजर करण्याचे आदेश

November 25, 2008 12:05 PM0 commentsViews: 2

25 नोव्हेंबर, मुंबईमालेगाव आणि नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी राकेश धावडे याला जिल्हा आणि सत्र न्यायालयानं 12 डिसेंबर रोजी हजर करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच्या चौकशीत महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याचं सूत्रांनी सांगितलंय. परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राकेशला नांदेडला आणलं होतं. तिथे या प्रकरणात आधी पकडलेले आरोपी आणि धावडे यांची समोरासमोर चौकशी करण्यात आल्याचं समजतंय. तसंच याप्रकरणी महत्त्वाची माहितीही समोर आल्याचं पोलीस सांगत आहेत पण ही माहिती काय आहे हे, सांगण्यास पोलिसांनी नकार दिलाय.

close