मावळमध्ये बळी गेलेल्या शेतकर्‍यांच्या वारसांना मदत नाहीच

June 1, 2012 1:59 PM0 commentsViews: 2

01 जून

पुणे जिल्ह्यातील मावळ गोळीबार प्रकरणाला 9 महिने पूर्ण झाले आहे. या घटनेत 3 शेतकर्‍यांच्या बळी गेला होता. बळी गेलेल्या शेतकर्‍यांच्या वारसांना राज्य सरकराने नोकरी देण्याच आश्वासन दिलं. परंतु याबाबत आजतागायत ना शासनाकडून विचारणा झालीय ना लोकप्रतिनिधीकडुून. या तिन्ही शेतक-यांच्या वारसांना पिंपरीं-चिंचवड महापालिकेत नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. तसा ठरावही मंजूर करण्यात आला,मात्र आता तो नेहमीप्रमाणे शासनाच्या लालफितीत अडकला आहे. सत्ताधारी या बाबत सारवा-सारव करतायत तर विरोधकांनी मात्र ह्या प्रकणावर सरकारवर टीका केली आहे. आपल्या मागण्या मागम्यासाठी आंदोलन करणारे तीनही शेतकरी आपल्या जीवाला मुकले, ते कधीच परत येणार नाहीत,आता किमान त्यांच्या वारसांची होणारी ससेहोलपट तरी शासनाने थांबवावी हिच अपेक्षा

close