वासिष्ठी नदीला रासायनिक पाण्याचा वेढा

June 1, 2012 2:38 PM0 commentsViews: 55

आरती कुलकर्णी, चिपळूण

01 जून

रत्नागिरी :- चिपळूणच्या वासिष्ठी नदीला कोकणची जीवनदायिनी म्हटलं जातं. वासिष्ठीबरोबरच खेडची जगबुडी नदी ही सुद्धा कोकणातली एक महत्त्वाची नदी. पण या नद्यांमध्ये लोटे परशुराम एमआयडीसीच्या रासायनिक कारखान्यांचं प्रदूषित पाणी सोडलं जातंय आणि गेली अनेक वर्षं याचा फटका नदीकाठच्या मच्छिमारांना बसतोय.चिपळूणजवळ नदीकाठच्या गावांतून वासिष्ठी नदीत शिरलं की नदीचं हे रूप मोहवून टाकतं. पण पुढे वासिष्ठी नदीला जेव्हा जगबुडी नदी मिळते तिथे करंबवणेजवळ या नदीत दिवसरात्र प्रदूषित पाणी सोडलं जातंय. हे पाणी आहे…लोटे परशुराम एमआयडीसीचं.

लोटे परशुरामच्या एमआयडीसीमधले 80 टक्के कारखाने हे रासायनिक कारखाने आहेत. आणि या कारखान्यांमधल्या प्रदूषित रासायनिक पाण्यामुळे या नदीकाळच्या 42 गावांतली मच्छिमारी पूर्णपणे बंद आहे. 1996 साली या नदीत जेव्हा मोठं प्रदूषण झालं आणि मेलेल्या माशांचा खच पडला तेव्हाचया प्रदूषणाची तीव्रता लक्षात आली. पण त्यानंतर तब्बल 9 वर्षांनी म्हणजे 2005 मध्ये या रसायनांवर प्रक्रिया करणारा एक प्लँट इथे बसवला गेला. पण या प्रक्रिया केलेल्या पाण्यामुळेही नदीचं प्रदूषण सुरूच आहे.

दाभोळ खाडीच्या मुखाजवळच होणारं हे रासायनिक प्रदूषण थांबवण्यासाठी मच्छिमार संघटना, पर्यावरणवादी कार्यकर्ते लढा देतायत पण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र यावर ठोस कारवाई करताना दिसत नाही.

close