दूधात भेसळ करणारं रॅकेट उघड

June 1, 2012 2:48 PM0 commentsViews: 82

01 जून

मुंबईत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर दूध भेसळ होत असल्याचं उघड झालंय. आज पहाटे खार पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी खारदांडा इथल्या पाच ते सहा घरांवर धाड टाकली. या घरातून 300 ते 400 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आलं आहे. यावेळी 5 जणांना अटक करण्यात आली. सर्व दूध हे तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

close