अनुजवर गोळ्या झाडल्याची आरोपीने दिली कबुली

June 1, 2012 3:29 PM0 commentsViews:

01 जून

पुण्यातील अनुज बिडवेची गोळ्या झाडून हत्या केल्याची कबुली मुख्य आरोपी कायरन स्टेपल्टन यांनी आज कोर्टात दिली आहे. इंग्लंडमध्ये शिक्षण घेणार्‍या अनुज बिडवेची मँचेस्टरमध्ये मागिल वर्षी 26 डिसेंबर 2011 रोजी भर रस्त्यावर गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली होती. वर्णद्वेषातून अनुजची हत्या झाल्याचं तपासातून पुढे आलं होतं. याप्रकरणी अटकेत असलेल्या कायरन स्टेपल्टनला आज शुक्रवारी लंडन कोर्टात हजर करण्यात आलं. अनुजची हत्या करण्याचा हेतू नव्हता असा पश्चाताप कायरनने व्यक्त केला. आता याप्रकरणाची पुढची सुनावणी 25 जूनला होणार आहे.

close