बीडमध्ये 6 औषध पुरवठादारांवर छापे

June 5, 2012 9:22 AM0 commentsViews: 5

05 जून

बीड जिल्ह्यात स्त्री-भ्रूण हत्येची वाढत्या घटना उघडकीला आल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. अखेर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने आता कारवाईला सुरुवात केली आहेत. जिल्ह्यातल्या सर्व हॉस्पिटल्सच्या तपासणीचा निर्णय घेतल्यानंतर आता सर्व होलसेल आणि रिटेल औषध विक्रेत्यांच्या तपासणीची मोहिम हाती घेतली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने 6 पुरवठादारांवर छापे टाकले. यातले दोन पुरवठादार दोषी आढळले असून त्यांच्या विरूध्द एफआयआर ही नोंदवण्यात आला आहे. तर परळीतल्या दोन मेडिकल दुकानांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्ह्यात गर्भपाताचं प्रमाण सर्वाधिक असल्यानं प्रचंड प्रमाणात बेकायदेशीर औषधपुरवढा होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.

close