अखेर मान्सून केरळमध्ये दाखल

June 5, 2012 4:31 PM0 commentsViews: 8

05 जून

 

मान्सूनची चातकासारखी वाट पाहणार्‍या तमाम भारतीयांना खुशखबर…अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. मागिल दोन-तीन दिवसांपासून केरळमध्ये वळव्याच्या पावसाने हजेरी लावली आहे. पण आता मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे असं भारतीय हवामान खात्याच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केलं आहे. येत्या दोन दिवसात मान्सून केरळ आणि कर्नाटकच्या भागात जोरदार बरसणार आहे. मान्सूनसाठी हवामान पोषक असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे. त्यामुळे येत्या सात दिवसांत मान्सून मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर देशातल्या इतर भागात जुलैच्या मध्यापर्यंत मान्सून बांगलादेश, भूतान आणि नेपाळपर्यंत पोहोचेल. पावसाच्या आगमानामुळे भात, सोयाबिन, कापूस यासारख्या पिकांच्या वेळेवर पेरण्या शक्य होणार आहेत. यावर्षी सरासरी इतका पाऊस होईल, असा अंदार भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला.   

close