डॉ.मुंडे दाम्पत्याचा जामीन अर्ज फेटाळला

June 6, 2012 9:49 AM0 commentsViews: 1

06 जून

परळी येथील डॉ. सुदाम मुंडे आणि त्यांच्या पत्नी सरस्वती मुंडे यांचा अटकपुर्व जामीन अर्ज अंबोजोगाई सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला आहे. पुढील सुनावणी 12 जूनला होणार आहे. डॉ मुंडे दाम्पत्य गेल्या 15 दिवसापासून फरार, मंगळवारी परळी न्यायालयाने डॉ.मुंडे पतीपत्नीला फरारी घोषित केलं. मुंडे दाम्पत्यांना कोर्टाने 3 जूलैपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. जर कोर्टात हजर झाले नाही तर संपत्ती जप्तची कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, राज्यभरात जिल्हात अन्न व औषधी प्रशासनाची छापेमारी सुरु केली आहे. राज्यातील 49 हॉस्पिटल,डॉक्टर यांच्या परवान रद्द करण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे.

close