आला रे…पाऊस आला, मान्सून कोकणात

June 6, 2012 11:25 AM0 commentsViews: 7

06 जून

गेल्या अनेक दिवसांपासून पाण्यासाठी व्याकुळलेल्या महाराष्ट्रवासियांना खुशखबर…अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. कोकण किनारपट्टीवर मान्सून पोहचला असून सिंधुदुर्गात पहिला पाऊस बरसत आहे. मात्र महाराष्ट्रात सर्वदुर पोहचण्यासाठी 48 तास लागणार आहे अशी माहिती पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी दिली. तसेच काल मंगळवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. मंगलोर, संपूर्ण कर्नाटकचा किनारी भाग ओलांडून गोवा राज्य मान्सूनने पसरले आहे त्याचबरोबर कोकण आणि दक्षिण कोकणाच्या भाग मान्सूनने व्यापला आहे असं खोले यांनी सांगितलं. सिंधुदुर्ग पाठोपाठ सातारा,नांदेड येथेही पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. आज सकाळी मुंबईतील काही ठिकाणी रिमझिम पावसाने मुंबईकरांना दिलासा दिला. त्याचबरोबर ठाणे, पुण्यातही रिमझिम पावसाने हजेरी लावली. महाराष्ट्रात मान्सून पोहचण्यासाठी पाच ते सात दिवसांचा अवधी लागणार असल्याची शक्यता होती. मात्र हवामान अनुकूल असल्यामुळे मान्सूनची गाडी महाराष्ट्रात धडकली आहे. यंदाच्या वर्षी उन्हाचा उकाडा आणि दुष्काळाची परिस्थितीला सामोर जावं लागलेल्या महाराष्ट्रवासीयांना हा सुखद गारवा अजून 48 तासानंतर मनमुराद लुटता येणार आहे.

close