सांगलीतल्या एड्स पीडित महिलेची सुटका

November 25, 2008 11:48 AM0 commentsViews: 20

25 नोव्हेंबर सांगलीअसिफ मुरसल सांगली जिल्ह्यातील मिरज इथं माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एड्स रोगानं पीडित असलेल्या एका महिलेला, शेतातल्या अडगळीच्या खोलीत अक्षरशः मरण्यासाठी कोंडून ठेवण्यात आलं होतं. अखेर प्रसिद्धी माध्यमांच्या पुढाकाराने या दुदैर्वी महिलेची सुटका झाली.शेतातल्या अडगळीच्या खोलीत या दुर्देवी महिलेला गेल्या आठ दिवसांपासून अन्न पाण्याविना कोंडून ठेवण्यात आलं. सासरच्यांनी त्या महिलेला घरातून अक्षरशः हाकलून तर लावलंच पण माहेरच्यांनीही तिला बाहेरचा रस्ता दाखवला. एडस्‌ने ग्रासलेल्या या महिलेला सख्ख्या नातेवाईकांनीच जणू मरण्यासाठी कोंडून टाकलं. हा प्रकार मीडियानेच पोलिसांना कळवला. त्यानंतर पोलिसांनी येऊन त्या महिलेची सुटका केली. आता पोलीस नातेवाईकांवर कारवाई करण्याचा विचार करत आहेत. आम्हीच आमचे ही सेवाभावी संस्थाही या महिलेच्या मदतीसाठी पुढे आली आहे. एड्स विरुद्ध लढण्याची गरज असतांना जर समाजच या रुग्णांना असं बहिष्कृतासारखे वागवत असेल, तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे.एड्स जनजागृती अभियानावर सरकार करोडोंचा खर्च क रत आहे. दुसरीकडे मात्र रुग्णांवर तडफडून मरण्याची वेळ येत आहे.

close