नागपुरात पेट्रोल 1 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त होणार ?

June 6, 2012 12:43 PM0 commentsViews: 4

06 जून

पेट्रोलच्या किंमती दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्याचं पुरत कंबरडं मोडलंय. सर्वसामान्यावरील भार कमी कसा करता येईल यासाठी प्रत्येक राज्य पुढाकार घेत आहे. अलीकडेच दिल्ली सरकारने पेट्रोलच्या किंमती 1 रुपया 60 पैशांनी कपात केली आहे. याच धर्तीवर नागपूर महापालिकेनं पाऊल उचलं आहे. शहरात पेट्रोल 1 रुपयानी स्वस्त होण्याची शक्यता आहे. याबद्दल आज पेट्रोलवरचा अधिभार कमी करण्याचा पालिकेचा प्रस्ताव आहे. पालिकेच्या बजेटमध्ये पेट्रोल एक रुपयानं तर डिझेल 3 रुपयानं कमी करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आता राज्य सरकाकडे पाठवण्यात येणार आहे. राज्य सरकारने मंजुरी दिली तर नागपूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

close