डॉ.मुंडे दाम्पत्याना 3 जुलैपर्यंत हजर राहण्याचे कोर्टाचे आदेश

June 5, 2012 12:23 PM0 commentsViews: 2

05 जून

परळीतील फरार डॉ सुदाम मुंडे याला 3 जुलैपर्यंत हजर राहण्याचे कोर्टाने आदेश दिले आहे. परळीतील संपत्ती प्रकरणी त्यांच्यावर कारवाई होत आहे. डॉ. सुदाम आणि सरस्वती मुंडे फरार 15 दिवसांपासून फरार आहेत. 3 जूनपर्यंत ते हजर झाले नाहीत तर त्यांच्या संपत्तीच्या जप्तीची प्रक्रिया सुरु होईल असं कोर्टानं सांगितलं आहे. सुदाम मुंडे याची मालमत्ता काल उघड झाली. पोलिसांनी कोर्टात मुंडेच्या संपत्तीचं विवरणपत्र सादर केलं. यामध्ये मुंडेंकडे 150 एकर शेतजमीन, परळीत बंगला आणि एक मोकळा प्लॉट तसेच 114 खाटांचं हॉस्पिटल असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तर औरंगाबादमध्ये 2 फ्लॅट आणि कुटुंबीयांची विविध बँकांत 40 खाती असल्याचं उघड झालंय.

close