एन्रॉन प्रकल्पाजवळ आणखी 5 प्रकल्पांचा घरोबा

June 6, 2012 1:13 PM0 commentsViews: 56

06 जून

मोठा गाजावाजा करुन सुरु झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातला दाभोळचा एन्रॉन प्रकल्पाजवळ आता आणखी पाच प्रकल्प येऊ घातले आहे. हे सगळे प्रकल्प दाभोळच्या खाडीच्या पट्‌ट्यात एकटवटले आहे. यातला धोपावेचा प्रकल्प सरकारचीच कंपनी महाजनको उभारतेय. पण त्याला गावकर्‍यांचा विरोध आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातला दाभोळजवळचा आरजीपीएल (RGPL) म्हणजे रत्नागिरी गॅस पॉवर लिमिटेडचा गॅसवर आधारलेला 2200 मेगावॅटचा वीजप्रकल्प. सध्या मात्र या प्रकल्पात 1200- 1600 मेगावॅट एवढीच वीजनिर्मिती होतेय. आणि त्यातच सरकारला RGPL प्रकल्पाजवळ आणखी पाच वीजप्रकल्प आणायचे आहे.

7 दाभोळजवळ सुमारे 30 किलोमीटरच्या परिसरात धोपावे, अंजर्ले, हर्णे आणि केळशी हे चार औष्णिक प्रकल्प प्रस्तावित आहेत. भोपणला जीएमआर कंपनीने आणखी एका प्रकल्पाची घोषणा केली आहे. हा प्रकल्प कोळशावर चालेल की गॅसवर हे अजून अधांतरीच आहे. या सगळ्या औष्णिक प्रकल्पांमुळे ज्यांना फ्लाय ऍश म्हणजेच राखेचं आणि हवेचं प्रदूषण सोसावं लागणार आहे ते सगळे गावकरी आता एकत्र आले आहे. याआधी रत्नागिरीजवळ झालेल्या जयगडच्या जिंदाल औष्णिक प्रकल्पाच्या फ्लाय ऍशमुळे म्हणजे कोळसा जाळून तयार झालेल्या राखेमुळे इथली हवा प्रदुषित झाली आहे. टर्बाइन्स थंड करण्यासाठीचं खारं पाणी विहिरीत मुरलं आणि विहिरी निकामी झाल्या. इथली आंबा बागायतही फ्लायऍशमुळे धोक्यात आलीय. हीच वेळ दाभोळ आणि दापोलीवरही येऊ नये असं या आंदोलकांना वाटतं आणि म्हणूनच हे आंदोलनाची धार तीव्र झालीय. अशा प्रकल्पांना परवाने देण्याआधी, या प्रकल्पांचा कोकणाच्या पर्यावरणावर काय परिणाम होईल याचा एकत्रित अभ्यास व्हायला हवा, असं पश्चिम घाट समितीचे अध्यक्ष माधव गाडगीळ यांचं म्हणणं आहे. वीज तर हवी, उद्योगही हवे पण त्यासाठी कोकणातल्या निसर्गसंपत्तीची किंमत मोजायला आपण तयार आहोत का..हा खरा प्रश्न आहे.

धोपावेला महाजनकोच्या औष्णिक प्रकल्पाची तयारी जोरात सुरू आहे. पण बाकीच्या प्रकल्पांची काय स्थिती आहे ?

जयगड – JSW एनर्जी

1200 मेगावॅटपहिला टप्पा सुरूदुसर्‍या टप्प्याला प्राथमिक पर्यावरण परवाना नाहीकेंद्राच्या तज्ज्ञ समितीची समितीची स्थगिती धोपावे – महाजनको4000 मेगावॅटसर्वेक्षणाचं काम सुरूपर्यावरण परवाना नाही

भोपणपंढरी -जीएमआर1800 मेगावॅटकोळशाचा प्रकल्प गॅसवर प्रस्तावित

अंजर्ले – टियाना 1600 मेगावॅटप्रकल्पाची घोषणा

केळशी – टियाना1600 मेगावॅटप्रकल्पाची घोषणा

हर्णे – हरिहरेश्‍वर पॉवर कंपनी1600 मेगावॅटजमिनी ताब्यात घेण्याचं काम सुरू

close