एचआयव्हीग्रस्त एसटी ड्रायव्हरला दिलासा

June 5, 2012 12:49 PM0 commentsViews: 4

05 जून

पुण्यातील एचआयव्हीग्रस्त एसटी ड्रायव्हरप्रकरणात राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी स्वत: लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं आहे. पुणे विभागातल्या एसटी ड्रायव्हरला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे ड्रायव्हर म्हणून काम करता येत नव्हतं. त्यानं हलकं काम देण्याची मागणी करूनही त्याला चार महिन्यांपासून एसटी महामंडळानं घरी बसवलं होतं. त्याला अनफिट असल्याचं कारण सांगत थेट नोकरीवरून काढून टाकत असल्याचं पत्र एसटी कडून देण्यात आलंय. या प्रकरणी परिवहन सचिवांशी बोलून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करुन असं सुरेश शेट्टी यांनी म्हटलं आहे.

close