नियोजन आयोगाने केले शौचालयांवर 35 लाख खर्च

June 6, 2012 2:02 PM0 commentsViews: 6

06 जून

गरीब जनतेला दिवसाला 28 रुपये खर्चाला पूरे असा निष्कर्ष मांडणार्‍या नियोजन आयोगाच्या कार्यालयात तब्बल 35 लाखांचे स्वच्छतागृह बांधले आहे. नियोजन आयोगाचं ऑफिस असलेल्या योजना भवन इमारतीतल्या स्वच्छतागृहावरुन वाद निर्माण झाला आहे. या दोन स्वच्छतागृहांच्या नुतनीकरणासाठी तब्बल 35 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. माहितीच्या अधिकारातून ही माहिती मिळाली. आर्थिक अडचणीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारनं काटकसर धोरण अंवलंबवलं आहे. विशेष म्हणजे गरिबीच्या खर्चाची मर्यादा सांगणारे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंह अहलुवालिया यांच्याचऑफिसमध्येच स्वच्छतागृहांसाठी 35 लाख रुपये खर्च करण्यात आल्यानं बरीच टीका होतेय. पण स्वच्छतागृहांचं नुतनीकरण गरजेचं असल्याचं अहलुवालिया यांनी सांगितलं आहे.

close