ओबामांनी केली आर्थिक सल्लागार मंडळाची नेमणूक

November 25, 2008 12:52 PM0 commentsViews: 2

25 नोव्हेंबर, वॉशिंग्टन आर्थिक मंदीवर तोडगा काढण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आर्थिक सल्लागार मंडळाची नेमणूक केली आहे. हे मंडळ अमेरिकेच्या आर्थिक प्रगतीवर लक्ष ठेवणार आहे.अमेरिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा त्यांच्या योजनांसह सज्ज आहेत. अमेरिकेत भविष्यात 25 लाख नोकर्‍या मिळू शकतील, अशी खात्री ते देत आहेत. न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्ह बँकेचे प्रमुख असणारे टिमोथी गेथनरदेखील त्यांच्या सल्लागार मंडळात आहेत. टिमोथी ग्याथनर हे वित्तीय कोष सचिव असतील, लॉरेंन्स समर हे नॅशनल इकॉनॉमिक कौन्सिलचे संचालक आणि ख्रिस्तीना रोमर या इकॉनॉमिक कौन्सिल सल्लागार मंडळाच्या अध्यक्ष तर मेलडी बारनेस या डोमॅस्टीक पॉलिसी कौन्सिलच्या संचालक असतील. हे सल्लागार मंडळ येत्या काही आठवड्यात सुधारणा सादर करेल, असं ओबामा यांनी सांगितलंय. बेलआऊट पॅकेजेस देऊनही न सावरलेल्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला सावरू तसंच ऑटो इंडस्ट्रीलाही आर्थिक संकटातून बाहेर काढू , असं आश्वासन ओबामांनी दिलंय.

close