आदर्श प्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांची चौकशी

June 5, 2012 1:28 PM0 commentsViews: 2

05 जून

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचीही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सीबीआयनं मुंबई हायकोर्टात दिली आहे. याप्रकरणी सीबीआयनं आज मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं. या घोटाळ्यासंबंधी दाखल याचिकेमध्ये विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, सुनिल तटकरे यांच्यासह इतरही काही जणांवर आरोप करण्यात आले आहे. या सर्व आरोपांचा तपास सुरू असल्याचं सीबीआयनं म्हटलंय. साक्षीदार म्हणून 2 माजी मुख्यमंत्री, प्रधान सचिव आणि राज्यमंत्र्यांचा जबाब नोंदवण्यात आल्याची माहितीही सीबीआयनं दिली.

close