कोळसा खाण वाटप प्रकरणी सरकारला घरचा आहेर

June 5, 2012 12:58 PM0 commentsViews: 4

05 जून

कोळसा खाण वाटपात गैरप्रकार झाल्याच्या मुद्यावरुन आता सरकारला घरचा आहेर मिळाला आहे. युपीएच्या घटक पक्षांपैकी एक असलेल्या तृणमूल काँग्रेसनंच या खाण वाटपाच्या मुद्यावरून सरकारला धारेवर धरलं आहे. आत्तापर्यंत विरोधक आणि टीम अण्णांनी सरकारवर टीकेची झोड उठवलीय. कोळसा खाणीचं वाटप हे कोल इंडिया आणि राज्याच्या अख्त्यारित असलेल्या कंपन्यांनीच हे परवाने द्यावेत अशी भूमिका तृणमूल काँग्रेसनं घेतली आहे. कोळसा खाण वाटपाच्या संसदीय समितीचे सदस्य असलेले तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी ही भूमिका मांडली आहे. त्यांसदर्भातला एक अहवालही त्यांनी दिला. कुठल्याही खासगी कंपन्यांच्या माध्यमातून ह्या खाण वाटपाचं काम केलं जाऊ नये, असंही त्या अहवालात म्हटलं आहे.

close