मोदींच्या विरोधात दिल्लीत झळकली पोस्टर

June 5, 2012 1:21 PM0 commentsViews: 4

05 जून

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हट्टामुळे संजय जोशी यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारीणीचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणानंतर आज दिल्ली आणि अहमदाबादमध्ये पोस्टर्स लावून मोदींचा उल्लेख न करता निषेध केला आहे. `छोटे मनसे कोई बडा नही होता, तुटे मनसे कोई खडा नही होता “ कहो दिल से संजय जोशी फिर से… अशी पोस्टर्स लावण्यात आली आहे. संजय जोशी गुजरातमध्ये अनेक वर्ष प्रचारक होते आणि त्यांनी भाजपही संघटनाही गुजरातमध्ये बंाधली त्यामुळे संजय जोशींना मानणारा एक वर्ग राज्यात आहे. मोदींची दादागिरी किती काळ सहन करायची असा प्रश्नही या पोस्टर्समध्ये विचारण्यात आला आहे. विशेष म्हणजे पक्षातील जेष्ठ नेते राजनाथ सिंह,मुरली मनोहर जोशी यांच्या घरासमोर हे पोस्टर्स लावण्यात आली आहे.

close