अण्णा हजारेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न

June 6, 2012 4:13 PM0 commentsViews: 5

06 जून

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांची गाडी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज संध्याकाळी वाशी येथे अडवण्याचा प्रयत्न केला. अण्णांचं आंदोलन भ्रष्टाचाराविरूध्द आहे की काँग्रेस विरूध्द असा सवाल हे कार्यकर्ते विचारत होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी अण्णांविरोधात जोरादार घोषणाबाजी केली. यापूर्वी नागपूरमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अण्णांच्या ताफ्यातील गाडीवर दगडफेक केली होती. सशक्त लोकायुक्तासाठी अण्णांचा महाराष्ट्र दौरा अंतिम टप्प्यात आहे. आज नवी मुंबईत तर उद्या ठाण्यात त्यांची शेवटची सभा आहे.

close