रेल्वे पार्सल, लगेजच्या भाड्यात 25 टक्क्याने वाढ

June 5, 2012 1:51 PM0 commentsViews: 8

05 जून

केंद्र सरकारने पेट्रोलची दरवाढ केली असल्याची घटना ताजी असताना आता रेल्वे प्रशासनाने पार्सल आणि लगेजच्या भाड्यात मोठी वाढ केलीय. रेल्वे सूत्रांनुसार ही भाडेवाढ सुमारे 25 टक्के असून ती 1 जूनपासून लागू करण्यात येणार आहे. या भाडेवाढीमुळे छोटे व्यापारी आणि व्यावसायिकांना फटका बसणार आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून अनेक व्यापारी भाजीपाला, द्राक्षं, डाळिंब यांसह जीवनावश्यक वस्तू पार्सल आणि लगेच्या माध्यमातून मुंबईसह इतर शहरात आणि राज्यांत पाठवतात. त्यामुळे या भाडेवाढीचा फटका या छोट्या व्यापारांना बसणार आहे. त्यामुळे त्यांना तुलनेनं महागड्या ट्रक वाहतुकीकडे पुन्हा वळावे लागेल असं चित्र निर्माण झालंय.

close