‘बंटी-बबली’ जोडीने केले अडीच कोटींची दागिने लंपास

June 6, 2012 5:03 PM0 commentsViews: 2

06 जून

पिंपरी चिचवड परिसरातल्या 4 सराफांकडील तब्बल साडेसात किलो सोनं घेऊन पोबारा करणार्‍या एका तरूण आणि तरूणीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंतवणूक करण्याचं आमिष दाखवून या दोघांनी सांगवी, चिंचवड, पिंपरी परिसरातल्या सोनारांकडून अडीच कोटी रूपये किंमतीचे दागिने घेतले. सर्व व्यापा-यांना घरी बोलावून त्यांच्याकडील दागिने सोन्याचेच आहेत का हे तपासायचं हे सांगत त्यांनी दागिने एका लाकडी बॉक्समध्ये ठेवले. व्यापार्‍यांना दुसर्‍या खोलीत बसवून हे भामटे सोनं घेऊन पसार झाले. ही बाब लक्षात आल्यानंतर व्यापार्‍यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी पुण्यातील फ्युचर व्हिजन इन्वेस्टमेंट कंपनीचे विरेश शहा यांच्यासह एका तरूण आणि तरूणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close