पावसासाठी पालिका सज्ज, मात्र कचर्‍याची’मिठी’ कायम

June 6, 2012 5:10 PM0 commentsViews: 2

06 जून

मुंबईत पावसाचा सामना करण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज असल्याचा दावा महापालिकेचे कमिशनर सीताराम कुंटे यांनी केला. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मिठी नदीचं काम नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झाल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. पण प्रत्यक्षात हे सर्व कागदोपत्रीच राहिल्याचा आरोप भाजप नेत किरीट सोमय्या यांनी केला आहे. 26 जुलैचा प्रलय ज्या मिठीनदीमुळे झाला त्या मिठी नदीच्या स्वच्छतेचं काम 31 मे 2012 ला पूर्ण होणं अपेक्षित होतं. आता जून महिना उजाडलाय मात्र मिठीनदीला नदीचं स्वरुप मात्र मिळू शकलेलं नाही. नदीच्या स्वच्छतेसाठी 860 कोटी रुपये खर्च झालेत. मात्र नदीचा नाला तो नालाचं राहिला आहे. आणि कामसुद्धा पूर्ण झालेलं नाही तर संरक्षण भिंतसुद्धा अपूर्णचं आहे.

close