पेन्शन विधेयक पुन्हा बारगळलं

June 7, 2012 2:50 PM0 commentsViews: 25

07 जून

यूपीए 1 च्या काळापासून रखडलेलं पेन्शन विधेयक पुन्हा एकदा बारगळलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात आज या विधेयकावर चर्चा झाली. पण सर्वसहमती न झाल्यानं हे विधेयक पुन्हा एकदा बारगळलं. तृणमूलचे खासदार मुकूल रॉय यांनी या विधेयकाला विरोध केल्याची सुत्रांची माहिती आहे. पेन्शन विधेयकात दुरुस्त्या सुचवणार्‍या स्थायी समितीवर तृणमूलचा कुठलाच सदस्य नसल्यानं तृणमूलनं नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनजीर्ंना नाराज करू नये, असं काँग्रेसला वाटतंय. आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

close