‘रोज म.रे त्याला कोण रडे’, मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा

June 6, 2012 5:42 PM0 commentsViews: 2

06 जून

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक आज बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमाराला चार तासांपासून विस्कळीत झाली. तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.अंबरनाथ ते कल्याण दरम्यान अंबरनाथला जाणा-या लोकलच्या पेन्टोग्राफमध्ये स्फोट झाल्यानं 3 लोकल जागीच बंद पडल्या होत्या. रेल्वे प्लॅटफॉर्मवरील विद्युत पुरवठा बंद झाल्यानं या दरम्यान असलेल्या सर्व प्लॅटफॉर्मवर प्रवाश्यांची मोठी गर्दी झाली आहे. संध्याकाळी सहाच्या सुमारास झालेला हा बिघाड नेमका कधी दुरुस्त होणार याबाबत कोणताही खुलासा रेल्वे प्रशासनाकडून अद्याप झाला नसून आता दोन्ही बाजुंची वाहतूक धीम्या गतीनं सुरु झाली आहे. कल्याण ते कर्जतदरम्यान जवळपास 15 ते 20 मिनिटे उशीरानं लोकलच्या फे-या सुरु झाल्या आहे.

close