मिशन ऑलिम्पिकसाठी हॉकी टीमची उद्या घोषणा

June 7, 2012 3:00 PM0 commentsViews: 5

07 जून

लंडन ऑलिम्पिकसाठी उद्या भारतीय हॉकी टीम जाहीर करण्यात येणार आहे. लंडन ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकीपटू सध्या पुण्यात सराव करत आहे. आणि इथंच टीमचे मुख्य प्रशिक्षक मायकेल नॉब्ज यांच्या मार्गदर्शनाखाली आज टीममधल्या खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आली आहे. पण उद्या दिल्लीत या खेळाडूंची नावं जाहीर करण्यात येणार आहेत. 26 फेब्रुवारीला भारतीय हॉकी टीमने फ्रान्सला लोळवत लंडन ऑलिम्पिकचे तिकीट काढले.या मॅचमध्ये टीमने 8-1 ने असा धुव्वा उडवला होता. गेल्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतीय टीम क्वालिफाय होऊ शकली नाही. 8 वर्षात पहिल्यांदाच भारतावर ही नामुष्की ओढावली होती. पण आता लंडन ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होत भारतीय हॉकी टीमनं ही नामुष्की दूर केली आहे.

close