चिदंबरम यांना धक्का ; खटला सुरुच राहणार

June 7, 2012 5:23 PM0 commentsViews: 5

07 जून

केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना दिलासा द्यायला मद्रास हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे आता चिदंबरम यांच्याविरोधात निवडणुकीशी संबंधित केस सुरू राहणार आहे. शिवगंगा मतदारसंघातून 2009 साली अतिशय कमी मताधिक्यानं ते लोकसभेवर निवडून गेले होते. पण त्यांनी या निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप करत, अण्णा द्रमुकच्या उमेदवारानं कोर्टात याचिका दाखल केली. ही याचिक रद्द करावी अशी विनंती चिदंबरम यांनी केली होती. ती आज हायकोर्टाने फेटाळली.

close