ग्लेन मॅक्ग्रा आयपीएलमध्ये खेळणार

November 25, 2008 1:09 PM0 commentsViews: 2

25 नोव्हेंबरआयपीएलमधल्या दिल्ली डेअरडेविल्स टीमसाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ग्लेन मॅक्ग्रानं आयपीएलच्या दुस-या सीझनमध्ये खेळणार असल्याचं सांगितलं आहे. इंग्लिश डेली टुडेमध्ये लिहलेल्या लेखात मॅक्ग्रानं हे स्पष्ट केलं आहे. वीरेंद्र सेहवाग आणि दिल्ली डेअरडेविल्सच्या इतर खेळाडूंबरोबर खेळण्यासाठी उत्सुक असल्याचं मॅक्ग्रानं म्हटलंय. डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्यानं मोहम्मद आसिफ डेअरडेव्हिल्समधून खेळू शकणार नाही. पण आता ग्लेन मॅक्ग्रा टीममध्ये परतल्यामुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सनं सुटकेचा निश्वास सोडला आहे.

close