ठाण्यातही अण्णांची गाडी अडवण्याचा प्रयत्न

June 7, 2012 4:23 PM0 commentsViews: 4

07 जून

सक्षम लोकायुक्त कायद्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या महाराष्ट्र दौर्‍याची आज ठाण्यात सांगता झाली. पण या शेवटच्या सभेत ठाण्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी अण्णा हजारेंची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.याआधी नवी मुंबईतही काल अण्णांच्या सभेपूर्वी निदर्शनं करण्यात आली होती. नागपुरातही अण्णांच्या ताफ्यातल्या गाडीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता.

close