डॉ. सानप यांचे हॉस्पिटल होणार सील

June 7, 2012 10:29 AM0 commentsViews: 4

07 जून

बीडमध्यील डॉ सानप यांच्या हॉस्पिटलविरोधात आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या डॉ शिवाजी सानप याच्या सानप हॉस्पिटल आणि डॉ माधव सानप यांच्या भगवान हॉस्पिटल सील करण्याची कारवाई केली जाणार आहे. भगवान हॉस्पिटलला अंतिम नोटीस देण्यात आली आहे. दुपारनंतर हॉस्पिटल सील बंद करण्याची प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्यानूसार या दोन हॉस्पिटलवर कारवाई होणार आहे.

close