नाशिकमध्ये पुन्हा एकदा वाहनाची जाळपोळ

June 7, 2012 10:46 AM0 commentsViews: 3

07 जून

नाशिकमध्ये पुन्हा एकदा वाहनांची जाळपोळ करण्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील विवेकानंद नगरमध्ये सात दुचाकी वाहनं आणि एक कार जाळण्यात आली आहे. यामागचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्त असतानाही अशाप्रकारे वाहनांची जाळपोळ करण्यात आली. यापूर्वी सिडको भागातल्या वाहनांचीही अशाचप्रकारे जाळपोळ करण्यात आली होती. जाळपोळ प्रकरणात यापूर्वी काहीजणांची तडीपारी करण्यात आली होती. तरीदेखील अशा घटना काही अजून थांबल्या नाहीत. त्यामुळं वाहनांची अशी जाळपोळ करणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे.

close