‘कॉमन मॅन’ पुन्हा अवतरला

June 7, 2012 12:27 PM0 commentsViews: 1

07 जून

सर्वसामान्य मुंबईकरांचं प्रतिनिधित्व करणारा 'कॉमन मॅन'चा पुतळा वरळीच्या सी फेसवर आज पुन्हा दिमाखात बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार , स्थानिक आमदार मंत्री सचिन अहिर यांच्या उपस्थितीत हा पुतळा वरळी येथेे बसवण्यात आला आहेत. वरळी सी फेसला आर के लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनच्या पुतळ्याचं नाक कापलं गेल्याची बातमी सर्वप्रथम आयबीएन लोकमतने दाखवली होती. या बातमीची दखल घेत राज्य सरकारने हा पुतळा तातडीने काढून दुरुस्तीसाठी दिला होता. अखेर आज नव्या रंगात,नव्या ढंगात 'कॉमन मॅन' सी फेसवर विराजमान झाले आहे. नव्याने तयार करण्यात आलेला कॉमन मॅनचा पुतळा एका बाकडावर ऐटीत बसलेला आहे. अजित पवारांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. कॉमन मॅनचा नवा पुतळा पाहून अजितदादाही हरखून गेले. 'कॉमन मॅन' सोबत बाकड्यावर बसून अजितदादांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

close