‘तुकाराम’ सिनेमा उद्या रिलीज

June 7, 2012 1:28 PM0 commentsViews: 2

07 जून

मान्सूनच राज्यात आगमन झाल्यामुळे सगळीकडे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे अशा मस्त वातावरणात या वीकेण्डला तीन नव्या चित्रपटांची मेजवानी असणार आहे. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित संत तुकाराम यांच्यावर आधारीत 'तुकाराम' सिनेमा रिलीज होतोय. तुकारामांचा माणूस ते संत हा प्रवास उभा केला आहे जितेंद्र जोशीनं. याशिवाय दिबांकर बॅनर्जी यांचा 'शांघाय' पाहता येईल. मुंबईसारख्या शहरात सामान्य माणसाला द्यावा लागणारा लढा यातून त्याने काढलेल्या मार्ग यावर 'शांघाय'ची कथा अवलंबून आहे. शांघाय मध्ये अभय देओल, इम्रान हाश्मी, कलकी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर हॉलिवूडचे मादागॅस्कर 3 आणि प्रोमिथियस हे सिनेमे रिलीज होत आहे. मादागॅस्कर 3 हा ऍनिमेटेड सिनेमा आहे, तर प्रोमिथियस हा रिडली स्कॉटचा सिनेमा. त्याच्याच एलियनचा हा सिक्वल म्हणता येईल.

close